महान आध्यात्मिक परंपरेचे एक प्रतीक, लाखो हिंदू -मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान सुफी संत “हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी” (रहे), उस्मानाबाद यांच्या ७१८ व्या उरुसानिमित्त हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी” (रहे),यांच्या दर्गा मध्ये प्रहार संघटनेच्यावतीने चादर चढवून आशीर्वाद घेण्यात आले व जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींच्या तसेच जिल्ह्यातील सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. जिल्ह्यातील बळीराजाला न्याय मिळावा व संपूर्ण जनतेला सुखी संपन्न करावे सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी यावी हीच प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली.
यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते चादर चढविण्यात आली उत्साहाच्या वातावरणात हा कर्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन प्रहारचे शहराध्यक्ष जमीर शेख यांनी केले
यावेळी जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे,उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,सहसचिव विठ्ठल चव्हाण,दत्ता पवार,बालाजी तांबे, रशीद शेख,राजेश भिसे,संदीप घोडके,अक्षय घुमटे,या सर्व पदाधिकारी यांचा जमीर शेख व उरूस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला…