
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव व महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना महाराष्ट्र च्या वतीने परंडा येथे तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परंडा तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींना परंडा तालुक्यातील दिव्यांग सवलती वंचित राहू नये म्हणून दिव्यांगाच्या हक्कासाठी शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समाजासमोर आणण्यासाठी तसेच अडीअडचणी सोडविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

मेळाव्याच्या अध्यक्ष व मार्गदर्शक स्थानी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर ककडे तर मार्गदर्शक व उदघाटक म्हणून प्रदीप डोके यांची उपस्थिती होती या मेळाव्यामध्ये 50,000 कर्जाचे दिव्यांग वित्त महामंडळ फॉर्म वाटप,बीज भांडवल फॉर्म वाटप,संजय गांधी निराधार योजना फॉर्म वाटप,इ रिक्षा योजनेची जागृती,पिवळे रेशन कार्ड,अंत्योदय रेशन कार्ड फॉर्म वाटप इत्यादी तसेच प्रदीप डोके आणि मयुर काकडे यांनी दिव्यांगाच्या रोजगाराच्या व योजनेच्या संदर्भात माहिती दिली तथा दिव्यांग अट्रोसिटी कायदा याची देखील जागृती करून फॉर्म वाटपाचा स्टॉल उभारण्यात आला होता

यावेळी चारशे ते पाचशे दिव्यांग उपस्थित होते
कार्यक्रमामध्ये प्रहारचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,महेश माळी शहराध्यक्ष जमीर शेख,नितीन जाधव,रियाज पठाण हे पाहूने म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रहारचे परंडा तालुकाध्यक्ष अमोल शेळके,पांडुरंग मिसाळ, पांडुरंग चोबे,घनश्याम शिंदे,सोमनाथ गायकवाड,गोकुळ गवारे,गोविंद चौधरी,इकबाल केसकर,दादा गवारे,जीवन तिपाले,सलामत शेख,शैला पोतदार यांनी केले
यावेळी तालुक्यातील प्रतिष्टीत मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते