प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव च्या वतीने आज मौजे इर्ला ता.जि धाराशिव येथे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव च्या 109 व्या शाखेचे अतिशय उत्साहात उदघाटन संपन्न झाले प्रहार संघटनेच्या माध्यमातून गावातील दिव्यांग बंधू भगिनींना या शाखेच्या माध्यमातून न्याय देण्याच काम प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात येणार असून दिव्यांग व्यक्तीच्या सर्व विभागातील अडीअडचणी सोडवुन समाजात प्रतिष्ठा व समान हक्क देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे असे प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले
या शाखेच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मयुर काकडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणुन गावचे सरपंच आण्णासाहेब पाटील उपस्थित होते तर पाहुणे म्हणून जिल्ह्यउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,जिल्हासहसचिव विठ्ठल चव्हाण,तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोईटे,तालुका संपर्क प्रमुख नवनाथ कचार,तालुका समनव्यक दिनेश पोतदार संजय नाईकवाडी,दत्ता पवार,सबदार शेख, आदींची उपस्थिती होती
यावेळी शाखेच्या शाखाप्रमुखपदी गौतम बापूराव दुधे,सहसचिवपदी उषा दगडू चौरे,शाखाउपाध्यक्षपदी अर्जुन रामा वाघमारे,कोषाध्यक्षपदी विकास बाळासाहेब शिरसागर,सचिवपदी तानाजी शिवाजी बिटे,उपकोषाध्यक्षपदी रंजीता महादेव सरवदे यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवर वर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…