प्रहार दिव्यांग संघटना धाराशिव च्या वतीने आज मा निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना प्रहार संघटनेच्या पदाधिकारी घेराव घातला
या दरम्यान प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष मयुर काकडे व जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी यांनी समाज कल्याण विभाग ,जिल्हापरिषद धाराशिव येथे असणाऱ्या रिक्त पदासंदर्भात वारंवार चर्चा करून निवेदन दिले आहे समाज कल्याण विभागा मार्फत दिव्यांग व्यक्तींची हेळसांड विविध अधिकारी यांच्याकडे मांडून देखील अजूनपर्यंत यावर तोडगा काढण्यात आलेला नाही यांचा परिणाम दिव्यांग व्यक्तीच्या लाभावर होत असुन ,भरपुर प्रस्ताव प्रलंबित रहात असून दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळत नाही ही शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना घेराव घालून निवेदन दिले,या निवेदन समाज कल्याण विभागातील रिक्त पदे तात्काळ भरून दिव्यांग व्यक्तींना न्याय देण्यात यावा अन्यथा प्रहार दिव्यांग संघनेच्या वतीने रिक्त असणाऱ्या खुर्च्या गांधी मार्गाने ताब्यात घेऊन स्वतः दिव्यांग बांधव अधिकाऱ्यांची जबाबदारी पाडतील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे, बाळासाहेब पाटील,महादेव चोपदार, जमीर शेख,दत्ता पवार,विठ्ठल चव्हाण,सुर्यकांत इंगळे,महेश माळी,संदीप घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते