मराठ्यांच्या कित्येक वर्षाच्या अभुतपुर्व लढ्याला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व धाराशिवच्या अनेक योध्याच्या साथीने यश प्राप्त झाले,यामध्ये धाराशिव जिल्ह्यातून नवतरुणांनी हिरहिरीने भाग घेतला जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांधा लावून या आंदोलनाला धार देण्याचं काम केले त्यापैकीच एक संकेत सूर्यवंशी, अक्षय नाईकवाडी,निखिल जगताप या मराठा योध्याचा सन्मान प्रहारच्या वतीने करण्यात आला.
या मराठा योध्याना या चळवळीत अजून ऊर्जा मिळावी या उद्देशाने सत्कार करण्यात आला तसेच या चळवळीच्या माध्यमातून असंख्य मराठा बांधवाना या युवकांच्या माध्यमातून न्याय मिळावा यावेळी मराठा समाजातील प्रत्येक घटकांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे या चळवळीत आपले मोलाचे योगदान देऊन मराठा चळवळीसाठी लढणाऱ्या मराठा योध्याना साथ द्यावी असे आवाहन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले यावेळी प्रहारचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष श्रीमंत गरड, बिरु माने,विठ्ठल चव्हाण,दत्ता पवार व प्रहारचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने संकेत सूर्यवंशी,अक्षय नाईकवाडी, निखिल जगताप यांचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…