प्रहार दिव्यांग क्रांती संस्था नाशिक च्या जिल्हाध्यक्षपदी श्री ललित पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नाशिकचे ललित पवार हे अल्पावधीतच दिव्यांग क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे तथा दिव्यांग चळवळीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्व मानले जाते.
प्रत्येक दिव्यांग व्यक्तींच्या अडीअडचणी साठी धावून जाणारा माणूस अशी त्यांची ओळख संपूर्ण नाशिक जिल्ह्यात असून याच कामाची पावती म्हणुन मा. ललित पवार यांची प्रहार दिव्यांग संघटना नाशिक च्या संयुक्त जिल्हाध्यक्ष पदी सार्थ निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप दिघे नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चंद्रभान गांगुर्डे कार्याध्यक्ष बबलु मिर्झा उपजिल्हाप्रमुख दत्ता कांगणे शहराध्यक्ष सुभाष निकाळजे उपजिल्हाप्रमुख रुपेश परदेशी आदिंच्या हस्ते देण्यात आले यावेळी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,या निवडीचे सर्वत्र जिल्हाभरातून कौतुक होत आहे