आज रोजी वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा मा.श्री.प्रकाशजी आंबेडकर साहेब धाराशिव येथे आले असता त्यांची जिल्ह्यातील दिव्यांग संघटनांनी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली
यावेळी दिंव्यागाच्या सामाजिक व राजकीय या प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सध्या सर्वत्र आरक्षणाबद्दल जोरदार चर्चा चालू असून ज्याप्रमाणे, शिक्षक मतदार संघ,स्थानिक स्वराज मतदार संघ हे एक त्या त्या घटकातील व्यक्तींना न्याय देण्याकरिता मतदान संघ स्थापन करण्यात आलेले आहेत त्याच राज्यात व देशपातळीवर दिव्यांगाची मतदार संख्या जास्त असून त्यांच्या न्याय,हक्क,मागण्या मांडण्याकरिता व त्यांचे प्रश्न अधिकाराने समाजात ठेवण्याकरीता दिव्यांग व्यक्तीकरिता ग्रामपंचयायत ते लोकसभा या क्षेत्रात दिव्यांगाना राजकीय आरक्षण किंवा दिव्यांग व्यक्ती करिता स्वतंत्र मतदार संघ स्थापन करण्याची मागणी आपण शासन दरबारी करावी अशी मागणी सर्व दिव्यांग संघटना समनव्य समिती धाराशिव च्या वतीने करण्यात आली
यावेळी ऍड मुकेश शिंदे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,महाराष्ट्र राज्य दिंव्याग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके,जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे,जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,संस्थापक सचिव रियाज पठाण,जिल्हा सहसचिव विठ्ठल चव्हाण,जिल्हाप्रसिद्धी प्रमुख अभिजित साळुंखे,दत्ता पवार, संदीप घोडके,आदी मान्यवर उपस्थित होते.