आज दिनांक रोजी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव तालुका लोहारा च्या वतीने संघटनेच्या 108 व्या शाखेचे उदघाटन करण्यात आले यावेळी सर्व दिव्यांग बांधवांत उत्साहाचे वातावरण दिसून आले,यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष तथा राज्यकार्यकारिणी सदस्य महाराष्ट्रराज्य मयुर काकडे यांच्या शुभहस्ते शाखेचे उदघाटन करण्यात आले,
यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी दिव्यांग व्यक्तीच्या योजना व अधिकार याबाबत माहिती दिली तसेच दिव्यांग व्यक्तींनी आपल्या दिव्यांग व्यक्तीच्या पाठीशी खांभिर उभा राहण्याच आवाहन केले,दिव्यांग व्यक्तीत एकजूट महत्वाची आहे असे आवाहन केले आणि दिव्यांग व्यक्तींनी फक्त दिव्यांग संघटनेतच कार्य करावे या बच्चू भाऊ यांच्या आदेशाचे गांभीर्याने पालन करावे असे ठणकावून सांगितले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा/लोहारा संपर्क प्रमुख अजीम खजुरे, जिल्हाउपाध्यक्ष महेश माळी, जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,जिल्हासचिव महादेव चोपदार,जिल्हा संघटक महंमद अत्तार,शहराध्यक्ष जमीर शेख,सुर्यकांत इंगळे,नवनाथ कचार,विकास खोटे,इसाक शेख,रवी शित्रे, आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी तालुक्यातील पदाधिकारी निवडी देखील करण्यात आल्या यामध्ये लोहारा तालुकाध्यक्षपदी श्रीमंत गरड,उपाध्यक्ष रमेश ढोबळे तर तालुकासचिव बाजीराव पाटील,सहसचिव किसन पवार,संपर्क प्रमुख लहू जाधव,महिला शुभांगी सितापुरे,तालुका सहसंघटक वैशाली धारुळे,शहर प्रमुख उमरअली शेख,सल्लागार राजाराम मोरे व बिरु माने,शाखाप्रमुख मुस्तफा ठाणेदार यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी उपस्थित बालाजी सूर्यवंशी,दीपक आलमले, यास्मिन शेख,निलोफर मुल्ला, सुभाष बिराजदार,लक्ष्मण बिराजदार, प्रफुल्ल तोडकर,नितीन माने,श्रीमंत बोडके व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…