येरमाळा प्रतिनिधी- येरमाळा तालुका कळंब येथे प्रहार अपंग क्रांती संस्था प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन (महाराष्ट्र राज्य) या संघटनेचा शाखा शुभारंभ कार्यक्रम थाटात संपन्न.
येरमाळा परिसरातील दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा दिव्यांगांना लाभ व्हावा, माहिती मिळावी म्हणून प्रहार अपंग क्रांती संस्था प्रणित प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेचा येरमाळ्यात शाखेचा शुभारंभ करण्यात आला, प्रहार अपंग क्रांती संस्थापक अध्यक्ष मा आ बच्चू भाऊ कडू यांच्या सूचनेनुसार शाखा अध्यक्ष म्हणून मारुती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच उपाध्यक्ष म्हणून किरण बारकुल यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच सचिव म्हणून वसंत जाधवर, सहसचिव राजेश बारस्कर, कोषाध्यक्ष नागनाथ मेजर बारकुल, सह कोषाध्यक्ष नितीन कवडे यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मयूर काकडे उपस्थित होते, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री वसंत जाधवर प्रहार संघटना सचिव येरमाळा यांनी केले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. सरपंच विकास भाऊ बारकुल उपसरपंच गणेश बाबा बारकुल शिवसेना विभाग प्रमुख राहुल पाटील, विलास बप्पा थोरबोले, सुनील वाघमारे रत्नापूर सरपंच, बाबा शेख, नवनाथ कासार, अनिल मिसाळ, उपस्थित होते.
कार्यक्रमानिमित्त बोलताना जिल्हा संघटक धाराशिव बाळासाहेब कसबे यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले तसेच शासनाच्या दिव्यांगासाठी च्या विविध योजना ची माहिती दिली व अपंगांनी आत्मनिर्भर कसे व्हावे याबद्दलची माहिती दिली व प्रहार अपंग क्रांती संस्थेची धाराशिव जिल्ह्यातील 107 वी शाखेचा आज शुभारंभ झाला असे सांगितले. तसेच अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना धाराशिव श्री मयूर काकडे यांनी अपंगाचे अधिकार व सर्व अपंगांना येरमाळा गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल तसेच शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व अपंग बांधवांनी त्यांच्या अधिकाराचा वापर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने करावा असे संबोधित केले. तसेच कार्यक्रमानिमित्त उपसरपंच गणेश बारकुल, मा सरपंच विकास भाऊ बारकुल, लहू पाटील, दत्ता बारकुल, कुंदन कांबळे यांनी आपले विचार मांडले व दिव्यांग बांधवांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच प्रहार अपंग क्रांती संस्थेतर्फे येरमाळा येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यानिमित्त पत्रकार कुंदन भैया कांबळे, दत्ता बारकुल, सुखदेव गायके, लहू पाटील, सचिन पाटील, जाफर शेख, अजित बेद्रे, बालाजी बारकुल, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती वाघमारे, किरण बारकुल, वसंत जाधवर, राजेश बारस्कर, नागनाथ बारकुल, नितीन कवडे, भास्कर कळसाईत, बाळासाहेब बारकुल, सचिन बारकुल, शेरखा पठाण, रवि बारस्कर, दिगंबर गाढवे, सुजित कावळे, आम्रपाली जाधव, रोहित बारस्कर, दत्ता मनगीरे, यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमा निमित्त सूत्रसंचालन बालाजी बारकुल यांनी केले तसेच सर्व उपस्थितांचे आभार किरण बारकुल यांनी मानले