प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा आक्रमक इशारा: आता आम्हीही रस्त्यावर!

Spread the love

शेतकऱ्यांचा जिवावर उठलेली कंपन्या – सरकार बधीर, प्रशासन मौन!

धाराशिव | 29 जुलै 2025 —वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांवर सेरेटिका व रेविनेंट (O2) ऊर्जा कंपन्यांनी चालवलेल्या बेकायदेशीर, जबरदस्तीच्या कारवायांविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आज प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, धाराशिव यांनी ठणकावून पाठिंबा दर्शवला.जिल्हाध्यक्ष मयूर ज्ञानेश्वर काकडे स्वतः उपोषण स्थळी पोहचून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना ठोसपणे पाठिंबा देत म्हणाले”हा लढा वाशी तालुक्याचा नाही, तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर प्रशासनाने त्वरेने निर्णय घेतला नाही, तर आम्हीही संघर्षाच्या रणभूमीत उतरणार!” कंपन्यांचा दहशतवाद — शेतकऱ्यांच्या जमिनीवर घुसखोरी, मोबदला नाही, परवानगी नाही!शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय थेट खांब उभारले जात आहेत, वीज वाहिन्यांचे काम सुरु आहे, आणि याला ना सरकारची रोक, ना प्रशासनाची नजर!शेतकरी व ग्रामस्थांना त्यांच्या हक्कांपासून बेदखल करून कंपन्या जो अन्याय करत आहेत, तो स्पष्टपणे भांडवलशाहीचा जबरदस्त टोकाचा नमुना आहे. प्रशासन गप्प… म्हणजे संगनमत?प्रशासनाचा आळशीपणा, सरकारची नजर चुकवण्याची कृती, आणि कंपन्यांचा बेधडक अट्टहास — या त्रिकोणात शेतकरी भरडला जात आहे.स्थानिक शेतकरी विचारू लागलेत“ही निपट गप्प प्रशासन व्यवस्था ऊर्जा कंपन्यांच्या ताटाखालची मांजर नाही तर काय?”

प्रहार संघटनेचा इशारा सरकारला — ‘बच्चू कडूंपर्यंत पोहचवणार आवाज, लवकर निर्णय न घेतल्यास मोठं वादळ उठेल!’प्रहार संघटनेने हे स्पष्ट केलं आहे की, हा लढा बच्चू कडूंना कळवला जाईल आणि जर लवकर तोडगा न निघाला, तर रस्त्यावरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडवला जाईल.

या पत्रकावर बाळासाहेब पाटील, दत्ता पवार, प्रकाश खडके, दादासाहेब अकोसकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. “शेतकऱ्यांचा आवाज दाबाल, तर रणकंदन उरेल!” – प्रहार संघटनेचा गर्जना इशारासरकार आणि प्रशासनाने जर वेळीच शहाणपणाचा निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन जिल्ह्याच्या सीमा ओलांडेल.आता हा संघर्ष केवळ उपोषणाचा नाही, तर हक्काच्या जिवंत लढ्याचा आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button