प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने आयोजन

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन, पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी देहूगाव ते आळंदी अशी अपंगांची थ्री व्हीलर पाठिंबा रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली अपंगांचे नेते मा. बच्चूभाऊ कडू यांच्या अमरावती ते यवतमाळ पदयात्रेला पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.मा. बच्चूभाऊ कडू हे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान दरमहा सहा हजार रुपये करण्यासाठी दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पदयात्रा करीत असून, या लढ्याला पिंपरी चिंचवड शहरातील अपंग बांधवांचा सक्रिय पाठिंबा आहे.रॅलीची माहिती:दिनांक: सोमवार, 07/07/2025वेळ: सकाळी 10:00 वा.सुरुवात: संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, देहूगावसमारोप: संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, आळंदीमार्ग: देहूगाव → तळवडे → चिखली → कुदळवाडी → मोशी → डुडुळगाव → नवीन पूल → आळंदीया रॅलीमध्ये सुमारे 30 ते 40 थ्री व्हीलर, 20 टू व्हीलर, रिक्षा आणि फोर व्हीलर वाहनांचा समावेश असणार आहे. ही रॅली अपंग बांधवांचे एकात्मता आणि न्याय्य मागण्यांसाठीचा आवाज बुलंद करणार आहे.या अनोख्या उपक्रमाबाबत माहिती प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र वाकचौरे यांनी दिली.