
धाराशिव, २६ जून –
समाजातील दुर्बल, मागास आणि उपेक्षित घटकांना न्याय देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज धाराशिव येथे स्मारक समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती आणि मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती २०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शाहू महाराज चौकात संपन्न झाला.

या कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बलराज रणदिवे, कुणाल निंबाळकर यांच्यासह अनेकांनी रक्तदान करत सामाजिक योगदान दिले.

कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, प्रा. कॅ. बुबासाहेब बागल, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, शिवसेना शहराध्यक्ष सोमनाथ गुरव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद वीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. प्रतापसिंह पाटील, शिक्षक पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, नितीन मसापचे अध्यक्ष नितीन तावडे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमात झालेल्या भाषणांमध्ये शाहू महाराजांच्या विचारांचा गौरव करण्यात आला. वक्त्यांनी त्यांच्या सामाजिक सुधारणा, शिक्षण क्षेत्रातील कार्य, जातिनिर्मूलनाचा संदेश आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी घेतलेल्या धोरणांची आठवण करून दिली.
प्रमुख मार्गदर्शकांमध्ये बाबासाहेब बागल, दत्तात्रय कुलकर्णी, सोमनाथ गुरव, डॉ. प्रतापसिंह पाटील, प्रा. रवी सुरवसे, सुदेश माळाळे, जयवंत ओमने, मयूर काकडे आणि बलराज रणदिवे यांचा समावेश होता.
शाहू महाराज स्मारक उभारणीसाठी लवकरच ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासनही अनेक वक्त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमात समता दल सैनिकांकडून मानवंदना देण्यात आली.
यावेळी शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बालाजी तांबे (सचिव, स्मारक समिती) यांनी केले.
सूत्रसंचालन माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांनी, तर आभारप्रदर्शन नंदकुमार गवारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनात धर्मवीर कदम, ॲड. सरफराज काझी, राहुल माकोडे, संजय घोडेराव, अक्षय राऊत, सौदागर माळी, संदीप शिंदे, आणि अनेक कार्यकर्त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली.
जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी: अध्यक्ष: मयूर काकडे,उपाध्यक्ष: आकाश मुंडे, बिलाल रजवी, विनोद निंबाळकर,सचिव: अभिजीत सूर्यवंशी,सहसचिव: सुनील जाधव,संघटक: अमर माळी,सहकोषाध्यक्ष: डेबो चिलवंत,प्रसिद्धी प्रमुख: आशिष साळुंके
शेवटी, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समता, शिक्षण आणि न्याय प्रस्थापित करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.