
अकोला, दि. १३ जून २०२५ – अकोला जिल्ह्यातील हिवरखेड (ता. तेल्हारा) येथील सुपुत्र नामदेव तुळशीराम इंगळे यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय मंत्री मा. श्री. संजय शिरसाट यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.नामदेव इंगळे यांचे एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण शिवाजी कॉलेज, अकोला येथे झाले असून, सध्या ते पुणे येथे लेखा नियंत्रक कार्यालयात ऑडिटर म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेत असूनही त्यांनी समाज कार्याची नाळ कायम जपली आहे.त्यांच्या समाजसेवेबद्दल प्रेरणा त्यांच्या पत्नी, निवृत्त शिक्षिका सौ. इंगळे यांच्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पाठबळामुळे समाजासाठी झटण्याची ऊर्जा मिळते, असेही ते म्हणाले.या पुरस्कारामुळे सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित झाले असून, अकोला जिल्ह्याचे नाव उज्वल करणाऱ्या नामदेव इंगळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.