“चलो मोझारी”ला मराठवाड्यातून उस्फुर्त प्रतिसाद – मयुर काकडे

शेतकरी, दिव्यांग, वाहनचालक, कामगार, विधवा महिला यांच्यासह वंचित घटकांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री आ. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे येत्या रविवार, दिनांक ८ जून २०२५ पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर, मोझारी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.मुख्य मागण्या:दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ₹६,००० मानधन,शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी,पिकांच्या आधारभूत किमतीवर २०% अनुदान,सरकारी रिक्त पदे त्वरित भरावीत,शेतमजुरांसाठी विकास मंडळाची स्थापना,ग्रामीण घरांसाठी ₹५ लाख अनुदान,शेतमालाला हमीभाव,दुधाला ₹५० प्रति लिटर,शेतमालाला ₹२५ प्रति किलो किमान दर,कांद्याची निर्यातबंदी उठवावी जोपर्यंत बाजारभाव ₹४० प्रति किलो होत नाही,मनरेगामध्ये पेरणीपासून कापणीपर्यंतची कामे समाविष्ट करावीत,मजुरी ₹५०० दररोज,मेंढपाळ, मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण,निवासी अतिक्रमणावर सुसंगत नियंत्रणया आंदोलनात शेकडो प्रहार दिव्यांग, शेतकरी, वाहनचालक व कामगार सहभागी होणार आहेत. “प्रहार दिव्यांग, शेतकरी चलो मोझारी” असा गर्जना देत बच्चू कडूंनी जनतेचे आवाहन केले आहे.

प्रहारच्या या आंदोलनाची दखल घेऊन समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनाची पोस्टर्स सध्या संपूर्ण राज्यात झळकत असून, त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शहीद भगतसिंग यांचे प्रेरणादायी प्रतिमा आणि रंगीत पगडीतील बच्चू कडूंच्या निर्धारपूर्ण मुद्रा लक्षवेधी ठरत आहेत.प्रहार जनशक्ती पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष मयुर काकडे यांनी मोझारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठवाड्यातून तथा धाराशिव जिल्ह्यातून नियोजन देण्यातआहे. यासाठी खालील जिल्हा तथा तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे:बारीसाहेब कसबे,महादेव खंडाळकर,बाळासाहेब पाटील,महादेव चोपदार,महेश माळी,इसाक शेख,जमीर शेख,अभिजीत साळुंखे,दिनेश पोतदार,नवनाथ कचार,गणेश शिंदे,मारुती वाघमारे,नयन नराटा,चित्रा शिंदे,हेमंत उंदरे,अमोल शेळके,बाबासाहेब भोईट,मारोती पाटील,रामेश्वर मदने,आपा उपरे या सर्वांनी मोझारी येथे शेकडो कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याची तयारी पूर्ण केली असून, आंदोलनासाठी आवश्यक सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे.