
धाराशिव, बॅक कॉलनी –हिंदवी बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान, बॅक कॉलनी, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती अत्यंत उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास बॅक कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः ‘अहिल्या सखी मंच’च्या महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमास विशेष रंग भरला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजहिताचे कार्य, न्यायनिष्ठा, महिला सबलीकरणासाठी केलेले योगदान आणि आदर्श प्रशासन पद्धती यावर उपस्थित वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमास धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि श्री. उध्दव हाके सपत्नीक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्त कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये –श्री. शिवाजी सोनटक्के, श्री. सोमनाथ लांडगे, ॲड. मनिष वाघमारे, ॲड. विद्या वाघमारे, सौ. भाग्यश्री इंगळे, सौ. सोनाली सोनटक्के, सौ. रंजना सोनटक्के, सौ. अलका मंगरुळे, मा. नगराध्यक्ष श्री. सुनील काकडे, श्री. अभय इंगळे, श्री. संदीप इंगळे, श्री. विशाल कोकाटे, श्री. ओमकार वाघमारे, श्री. अनिल मंगरुळे, तसेच समस्त सोनटक्के परिवार यांचा समावेश होता.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये आयोजक संस्था व स्थानिक नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी राजमातांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.