
सातारा, कराड दि. १३मे २०२५.सातारा जिल्ह्यातील प्रहारच्या रणरागिणी “समिना आबु शेख. यांच्या समाजा प्रती असामान्य योगदाना ची दखल घेत”संताजी धनाजी पुरस्कार अंतर्गत “संत गाडगेबाबा सामाजिक सेवा,प्रथम पुरस्काराने मा.बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते, सन्मानित”प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संताजी-धनाजी कार्यकर्ता सन्मान २०२५ अंतर्गत राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर १३ मे २०२५ रोजी कराड येथे झालेल्या विभागीय (पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर)मेळाव्यात, “प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष “मा.बच्चूभाऊ कडू”यांच्या शुभहस्ते तथा उपक्रम प्रमुख महेश बडे,निरीक्षक मंगेश ठाकरे, प्रशांत,देवतळे, गौरव जाधव यांच्या उपस्थितित “संत गाडगेबाबा सामाजिक सेवा प्रथम पुरस्काराने सातारा जिल्ह्यातील समिना आबु शेख.सन्मानित”…..हा पुरस्कार “समिना आबु शेख” यांना त्यांच्या सातत्यपूर्ण, सर्वसमावेशक, सामाजिक व लोकहितासाठी केलेल्या कार्याबद्दल प्रदान करण्यात आला.आपल्या संघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणे, विविध सामाजिक उपक्रमात भाग घेणे, “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या एकमताने त्यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली.या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना समिना शेख यानी सांगितले> “हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांना,माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या संघटनेतील प्रत्येक सहकाऱ्याला, आशीर्वाद देणाऱ्या त्या प्रत्येक दिव्यांगाना,माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर सदैव कृपा करणाऱ्या देवाला समर्पित करते. “कर्म श्रेष्ठ तर अंत श्रेष्ठ”त्यामुळं चांगल कार्य केल्याची ही पोचपावती आपल्या दैवताच्या हातून मिळणे हे मी माझं भाग्य समजते. मा.बच्चुभाऊंची प्रेरणा हीच आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची खरी ताकद आहे.”हा सन्मान केवळ एक पुरस्कार नसून..समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारा आहे. कोणी एक व्यक्ती एक पदाधिकारी कार्यकर्त्या शिवाय काहीच नाही, कार्यकर्ते हे त्या व्यक्ती चे आधार स्तंभ असतात. प्रहारचे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलणाऱ्या तले नसून आपल्या देवता प्रमाणे सेवा पुरवणारे सिद्ध झाले … ही एक प्रहार मावळ्यांची परीक्षा होती आणि ती पास होणे याच समाधान त्यांनी मानले.मा.बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारते वेळी समिना शेख यांच्या समवेत त्यांच्या मातोश्री (प्रथम गुरू), जरिना शेख,प्रवीण भुजबळ, प्रवीण फडतरे, प्रियांका ढोक, विमल जाधव, संतोष दुबे, किशोर जमदाडे,अनिल मोटे,राजेंद्र गावडे, प्रशांत धोंगडे,लक्ष्मी मेहरा, दत्ता जाधव,सुनील वेदपाठक,ओम लोहार, चांदणी कुडाळकर, दुधाने, धायगुडे, राजेंद्र राऊत,कावळे,तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते…