
धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथे आज दिनांक 23एप्रिल रोजी मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांच्या प्रयत्नातून . पोलाद स्टील कंपनी जालना यांच्या सहकार्याने व कंपनीच्या सेस फंडामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी या शाळेत फिरत्या तारांगणाची सोय करण्यात आली.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे या उपक्रमात विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रोजेक्शनच्या माध्यमातून आकाशातील तारे ग्रह नक्षत्रे आणि आकाश गंगेचे अद्भुत दर्शन व चांद्र यान चे यशस्वी उड्डाणं पाहण्याची संधी मिळाली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयी उत्सुकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. हवा पूर्ण भरलेल्या एका डोम मध्ये बसून आपण आकाशगंगेची सर करत सूर्य चंद्र तारे जणू काही आपले मित्रच आहेत पृथ्वीच्या ही पलीकडील ताऱ्यांचे जग पृथ्वीवरून आपणास डोळ्यासमोर उलगडत ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात ही कल्पना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न झाला. अंदाजे पाच ते आठ मीटर व्यासाचे हवा भरलेले डीजी स्टारचे छोटे तारांगण काही क्षणातच आपल्या डोळ्यासमोर तयार होते. या डोम मध्ये अत्याधुनिक फिश आयलेन्स वापरून अत्युच्च प्रतीचा प्रोजेक्टर मध्ये भागी लावला होता. यामध्ये एका वेळी 40 ते 50 विद्यार्थी सहज सामावतील इतकी जागा आहे. आळणी येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या एकूण 255 विद्यार्थ्यांनी या फिरत्या तारांगणा चा अनुभव घेतला.

यामध्ये विद्यार्थ्यांना आकाशगंगा चंद्रयान मोहीम आणि 2040 मधील आगामी चंद्रावरील मानवी वस्तीचे आभासी विश्व दाखवण्यात आले. थ्रीडी स्वरूपातील दृश्य प्रतिमा मुळे विद्यार्थ्यांना जणू काही आकाशात सफर केल्याची अनुभूती घेता आली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हैदराबाद पुणे मुंबई बेंगलोर आधी ठिकाणी जाण्यापेक्षा गावातील शाळेतच तारांगणाचा अनुभव घेता आला. याबद्दल भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल आणि पोलाद स्टीलचे आभार श्री माने हनुमंत यांनी व्यक्त केले. या शोसाठी कंपनीचे ऑपरेटर श्री सुरज क्षीरसागर व दादासाहेब क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले, त्यांच्या सहकार्य बद्दल मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला . या तारांगण शोसाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
