
परंडा – खाँजा बद्रुद्दीन यांचा वार्षिक उरूस परंडा येथे दरवर्षी आठ रज्जबला होत असतो. हा उरुस सामाजीक आध्यात्मिक, साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या फारच महत्वपूर्ण मानला जातो. या
उरुसामध्ये सर्व-जाती धर्माचे लोक उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसतात.
परंडा तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुवार ता.९ जानेवारी २०२५ रोजी हजरत खाँजा बद्रुद्दीन चिश्ती शहीद रहमतुल्लाह अलैही यांचा ७०५ वा उरुस साजरा होत आहे. खाँजा बद्रुद्दीन यांचे संपूर्ण नाव ‘हजरत किबला खाँजा बद्रुद्दीन शहीद चिश्ती सर्शअल अजीज’ असे होते. खाँजा बद्रुद्दीन यांचा कालखंड १४ व्या शतकातील असून ते मुस्लिम धर्मातील धार्मिक वृत्तीचे सामाजिक व मानवीय संदेश दिणारे एक सुफी संत होते.

खाँजा बद्रुद्दीन व अमिर खुसरो हे दोन्ही सुफी पंथीय असून, हजरत निजामोदीन अवलिया यांचे मुरीद (शिष्य) व खलिफा (उत्तराधिकारी) होते. आपल्या धर्मगुरुच्या आदेशानुसार धर्माच्या आदेशामुळे धर्माचा मानवतावादी संदेश भारतभर पोहचविण्यासाठी हजरत खाँजा बद्रुद्दीन हे दिल्लीहून ७०० अवलिया (वली) सह दक्षिण भारताच्या दक्षिण भागात आले. दक्षिण भारताच्या परिसरात आल्यानंतर त्यांचे वास्तव्य अलिबाग सध्याच्या रायगड जिल्हयात त्यांनी आपले वास्तव्य कायम केले. रायगड जिल्हयातील पेण तालुक्या पासुन सात किलोमिटर अंतरावर गोबीरले फाट्याजवळ बेलवली नावाचे एक खेडेगाव आहे. या बेलवली खेड्याजवळून सहयाद्री पर्वताच्या रांगा गेलेल्या आहेत. याचं पर्वतरांगेच्या परिसरात एका उंच डोंगरावर त्यावेळेसचा पाण्याचा हौद व खाँजा बद्रुद्दीन यांनी बसण्याची ठरावीक जागा अद्याप ही पाहवयास मिळते.
डोंगरमाथ्यावर त्यांची सर्व राहण्याची सोय, बसण्याचे आसन व डोंगर पायथ्याला एक घुमट त्या घुमटाजवळ सध्या त्यांचा दर्गा आहे. याचं ठिकाणी खाँजा बद्रुद्दीन आपल्या अनुयायांना धर्माचा उपदेश देत होते. त्यांचा आध्यात्मिक ज्ञानावर जास्त भर होता. त्याच प्रमाणे तमाम मानवाच्या हिताची व बंधुभावाची शिकवण ते देत होते. अशी त्यांची ख्याती आहे. खाँजा बद्रुद्दीन यांचे मोठे भाऊ पेण तालुक्यातच वास्तव्य करीत होते पेण पासुन ३० कि. मी. अंतरावर त्यांच्या मोठ्या भावाचा भुमरा या गावी दर्गा आहे.
अतिशय पावित्र्य संपादन करुन आध्यात्मिक शक्ति प्राप्त असलेले ७०० अवलियांचे गुरुत्व पत्कारून विधायक कार्य व वेळप्रसंगी संग्राम करणारे खाँजा बद्रीदीन एक सुफी संत म्हणून परिचित आहेत.
आध्यात्मिक शिकवण व मानवी संदेश देण्याचे कार्य केले. खाँजा कोकण विभागात शांतीचा संदेश देण्यासाठी आले. त्या भागातील अनेक लोक प्रभावित झाले, लोकांत चैतन्य निर्माण झाले, अन्यायाविरुद्ध सत्यासाठी लढणाऱ्या हजरत खाँजा बद्रुद्दीन यांना अल्लाहने प्रचंड अशी अध्यात्मिक शक्ति प्रदान केली होती. अल्लाहने प्रदान केलेल्या प्रचंड शक्तिच्या जोरावर ते घोड्यावर बसून लढत होते. त्या डोंगरातील रानटी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि रज्जब ७४१ ला त्या बेलवली गावा जवळ खाँजा बद्रुद्दीन शहीद झाले. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात, त्यांचे (शिर) मुंडकेच छाटले गेले. त्यांच्यासोबत त्यांची आई, पत्नी, मुले होती. ते तेव्हाच शहीद झाले, तेथेच त्यांचा दर्गा आहे.
खाँजा बद्रुद्दीन मुंडकेच पेण च्या दर्गात दफन करण्यात आले बाकी धड मात्र घोड्यावर तसेच शत्रुंचा मुकाबला करत-करत काही साथीदारांसह ने परंडा तालुक्याच्या ठिकाणी इ.स. १३२० ला पोहचले. त्या काळी पलियंडा या नावाने ओळखले जायचे व आज ते परंडा नावाने प्रचलित आहे.
उरुस आज गुरुवारी आहे म्हटल्यावर सकाळी ५ वाजल्याच्याआत ते कबरीला सर्व अत्तरांन धुतात व त्याचा प्रसाद म्हणून ठेवतात. त्यासाठी लोक पहाटेची नमाज होताच तिथे प्रसादासाठी रांग लागलेल्या असतात.
मुस्लिम बांधवां बरोबर इतर समाजातील नागरीक मोठ्या भक्तिभावाने दरग्यात जाऊन दर्शन घेतात उरुसाच्या वेळी परंडा शहर गजबजलेले दिसुन येते. या सुफी संताच्या संदेशाप्रमाणे या उरुसामध्ये काही भेदभाव दिसत नाही. सर्व बंधुभावाने सामाजिक समुदाय एकत्रित उरुस साजरा करताना दिसतात.
उरुसामध्ये गंधसंदल व फुलांची चादर १३२५ फसली इ.स.१९१५ मध्ये परंड्याच्या भुईकोट किल्ल्यात त्यावेळी असलेल्या तहसील मधून निघत असे त्या वेळेस चे तहसीलदार आगाशेव अली रज्जा यांच्या डोक्यावर गंधसंदल व फुलांची चादर देऊन किल्ल्या बाहेर येत असे संदल निघाल्यावर घोडा तहसील पासून दर्ग्यापर्यंत मोकळ्या मनाने जातो यानंतर 1330 फसली इ.स. १९२० साली तहसील ऑफिस किल्याबाहेर बांधलेल्या इमारतीत आले व आज स्थितित सन २०१२ पासून बार्शी रोडवरील तहसिल कार्यालयातून परंपरागत मानाचे तहसिलदार यांच्या डोक्यावर चादर ठेवुन उरुसाची सुरुवात होते. उरुसाला मुंबई, पुणे गुलबर्गा, हैदराबाद व महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून भाविक हजारोंच्या संख्येने येतात. या उरुसात कव्वाली, कलगीतुरा, गझल, मुशायरा, कब्बडी, कुस्ती, रेड्याच्या टकरी इ. सांस्कृतिक कार्यक्रम उरुस कमिटी कडून आयोजित केले जातात.
प्रा.डाॕ.निलोफर महेबुब चौधरी (परंडा )
श्री.शिवाजी महाविद्यालय बार्शी !