महाराष्ट्रातील लाखो दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी यशस्वीपणे लढा देणाऱ्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी पुणे जिल्ह्याचे वाघोली येथील सुपुत्र असलेलले धर्मेंद्र सातव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
शेगाव बुलढाणा येथे झालेल्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित महाराष्ट्रातील बहुसंख्य प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष. राज्य समन्वयक . विभाग प्रमुख .यांच्या मागणीवरून धर्मेंद्र सातव पाटील यांची प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांनी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली . निवड झाल्यानंतर प्रहार संघटनेचे सर्वे सर्वा बच्चू कडू यांनी निवड झाल्याबद्दल धर्मेंद्र सातव यांचे हार घालून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
धर्मेंद्र सातव हे गेले 30 वर्षापासून दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी सनदशीर मार्गाने लढा देत आहे.
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे संस्थापक सदस्य असून संघटनेच्या स्थापनेपासून एकनिष्ठपणे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
प्रहार संघटनेच्या झालेल्या प्रत्येक दिल्ली. मुंबई .गुजरात .राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात झालेले आंदोलने . उपोषणे. यात भाग घेतला आहे . संघटनेच्या प्रसारासाठी दिव्यांग कार्यकर्त्यांना घेऊन राज्यात सक्रिय सहभागी झालेली आहे.
महाराष्ट्रातील दिव्यांगा मध्ये धर्मेंद्र सातव हे लढाऊ बाणा व. नम्र स्वभावामुळे बद्दल मोठा आदर आहे.
त्यामुळे त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्रातील दिव्यांगांनी आनंद व्यक्त केला आहे.
धर्मेंद्र सातव पाटील यांच्या निवडीनंतर त्यांना राज्यातील कानाकोपऱ्यातून दिव्यांग बांधव फोन करून व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत आहे.
दिव्यांगांच्या लढ्यात आक्रमक म्हणून
संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले धर्मेंद्र सातव पाटील यांनी निवड झाल्यानंतर सांगितले आगामी काळात आमदार बच्चू कडू यांचे नेतृत्वाखाली दिव्यांग बांधव यांच्या प्रमुख मागण्यासाठी 1) स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे
2) प्रति महिना पाच हजार रुपये मानधन. पेन्शन मिळावे.
3) भूमिहीन बेगर दिव्यांगांना घरकुल मिळावे
4) सरकारी नोकरीतील दिव्यांगांचा अनुशेष कोटा भरून काढावा.
5) अडथळा विरहित सार्वजनिक ठिकाणे .शासकीय कार्यालय इमारती करण्यात यावी.
6 )मोफत आरोग्य उपचार मिळावे
7) व्यवसायासाठी जागा व अर्थसहाय्य मिळावे
8) दिव्यांग शाळा कर्मशाळा यामध्ये आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळावे
9) दिव्यांगांच्या कलागुणांना खेळांना प्रोत्साहन मिळावे याकरिता कला अकॅडमी क्रीडा अकॅडमी निर्माण करावे
या व इतर *प्रमुख मागण्यासाठी
आक्रमकपणे जन आंदोलन लढा देण्यात येणार आहे.तसेच गाव तेथे प्रहार शाखा याकरिता राज्यभर संघटनेच्या वाढीसाठी घटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांना घेऊन दौरे करणार आहे.
*संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन यांच्या पुनर्वासन कार्यासाठी आगामी वाटचाल करणार असल्याचे धर्मेंद्र सातव पाटील यांनी सांगितले*