सध्या महाराष्ट्र विधानसभेचे पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया चालू आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरातून हजारो शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे, हे कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून कर्तव्यावर कार्यरत असतात. त्यांनाही मतदानाचा अधिकार बजावता यावा म्हणून निवडणूक विभागाकडून त्यांना पोस्टल मतपत्रिका देण्यात येते त्यासाठी प्रशिक्षणात संबंधित कर्मचाऱ्याकडून आवश्यक ती माहिती घेतली जाते व त्यांना पोस्टर बॅलेट देण्यात येतो पण,जिल्हाभरात असंख्य शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना किरकोळ त्रुटी काढून त्यांना पोस्टर बॅलेट पेपर देण्यात आलेले नाहीत. अशी अनेक शिक्षकांनी कर्मचारी संघटनेकडे तक्रार केली आहे. राज्यात व जिल्ह्यात सर्व शिक्षक सर्वांनी हे मतदान करावे म्हणून जनजागृती करत असतात पण महसूल विभागाच्या चुकीमुळे संबंधित शिक्षक व कर्मचारीच मतदानापासून वंचित राहू शकतात.बऱ्याच वेळी महिला व काही शिक्षक कर्मचारी यांना वेळेत किचकट प्रक्रियेमुळे आवश्यक ती माहिती देता येत नाही,व ते वंचित राहतात. तसेच सर्व मतदारांनी मतदान करावे म्हणून प्रशासनाकडून व अनेक शाळेमधून ही जनजागृती करण्यात येते जनजागृती करणारेच कर्मचारी जर मतदानापासून वंचित राहू शकतो तेव्हा कार्यावर असणारे एकही शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये म्हणून स्वतंत्र कक्ष स्थापना करून सर्वांना मतदानाचा अधिकार द्यावा व त्यांना पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करून द्यावे ही मागणी निवेदनाच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघ धाराशिव च्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली, यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, राज्य नेते बशीर तांबोळी, लालासाहेब मगर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते