स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन,चळवळीतील एक विधायक कार्य म्हणून , नादुर्गा, बरमगाव, वडवळा या संयुक्त ग्रामपंचायती मध्ये प्रहार दीव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव च्या 112 व्या शाखेचे उद्घाटन उस्ताहात करण्यात आले
प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार संघटनेचे बाळासाहेब कसबे,संजय नाईकवाडी, दता पवार,विठ्ठल चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते..
शाखेच्या शाखाध्यक्ष दत्तात्रय पांडुरंग कोळगे यांच्यासह उत्तम विश्वनाथ शिंद,डोलाणे दत्तात्रय कोळगे, बाळ नाना – कोळगे ,गणेश राजेद्र डावखरे, सुनीता दादा डावकरे, मोला शाबुल शेख, वासाळी सोनकर,विष्णू कोळगे,सचिन त्रिंबक बोरगा,सुरेश शेंबळे शेख, मोहिनी दत्ता मेलगिरीक ,माऊली हरिदास देवळे,बंबराजदा विठ्ठल पवार आदी पदधिकारी यांची निवड करण्यात आली
येणाऱ्या काळात दिव्याग व्यक्तींना समाजात प्रतिष्टा मिळविण्या करीता प्रहार संघटनेच्यावतीने माध्यमातून बच्चू कडू यांचे शिलेदार म्हणून आम्ही आहोरात्र प्रयत्न करूत असे गावातील दीव्यांग व्यक्तींना मयुर काकडे यांनी आवाहन दिले ….