धाराशिव जिल्हयातील दिव्यांग बांधवांच्या विविध खालील प्रमुख मागणी करीता दि.05/03/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे प्रहार रास्ता रोको आंदोलन करण्याबाबत ईशारा प्रहार संघटनेच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला होता
या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन दिनांक 4 मार्च 2024 रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथे धारशिवचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हातील दिव्यांग व्यक्तींच्या एकूण 33 मागण्यांवर संबधीत शासकीय अधिकारी यांच्यासमवेत समस्या दूर करण्याचा निर्णय झाला व जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला,यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी दिव्यांगाच्या सर्व समस्या व अडचणी या संदर्भात संबधीत अधिकाऱ्यांना जाब विचारला व लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातुन पाऊले उचलावी असे आवाहन केले,यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष महेश माळी, बाळासाहेब पाटील,जमीर शेख,दत्ता पवार,दिनेश पोतदार,नवनाथ कचार,विठ्ठल चव्हाण,संदीप घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते,प्रहार संघटनेच्या पत्राला प्रतिसाद देऊन जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ बैठक दखल घेतल्यामुळे प्रहरच्या वतीने त्यांचा सत्कार देखील संघटनेच्या वतीने करण्यात आला.
तसेच बैठकीदरम्यान झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास अजून पुढच्या काळात आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला