केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून जिह्यातील पात्र ज्येष्ठांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांच्या हस्ते शारीरिक सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी झाला.
मंचावर भाजपचे नितीन काळे, रामराजेसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी देवदत्त गिरी, गटविकास अधिकारी राजू कांबळे, धाराशिव दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, ‘अल्मीमको’चे किरण पावला यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठांना अपंगत्वामुळे आपल्या दैनंदिनी गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड दयावे लागते.
आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना अपंगत्वावर मात करण्यासाठी आवश्यक उपकरणे विकत घेणे शक्य होत नाही. अशा अशक्त, दुर्बल आणि ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत शासनाकडून मोफत शारीरिक सहायक उपकरणे दिली जातात. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी सीईओ डॉ. घोष यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्य देण्यात आले. सर्व ज्येष्ठ नागरिक हे आमच्या आई- वडिलांसारखे आहेत. शारीरिक सहाय्यक उपकरणांमुळे या ज्येष्ठ नागरिकांना निश्चित ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Bacchu Kadu
Bacchu Kadu Fan Club