“एसटी महामंडळाच्या बस मध्ये दिव्यांगांना सवतीची वागणूक” दिव्यांग कल्याण आयुक्तांच्या आदेशाला टोकरी

Spread the love

महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी महाव्यवस्थापक ,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई यांना 27/01/2024 रोजी आदेश देऊनही आजतागायत दिव्यांगांना शिवनेरी बस व वीणा वातानुकूलित शयन आसनी बस मध्ये सवलत दिली जात नाही याबाबत राजेंद्र वाकचौरे उपाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहर यांनी पुन्हा आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. एसटी महामंडळाच्या शिवनेरी बस,साधी शयन आसनी बस, नऊ मीटर, बारा मीटर ई शिवाई, या बस मध्ये दिव्यांग व्यक्तींना सवलत दिली जात नाही याबाबत तक्रार अर्ज क्रमांक 00010/2022 मध्ये मागणी केल्यानुसार शिवनेरी बस व साधी शयन आसनी बस मध्ये दिव्यांग व्यक्तींना सवलत दिली जात नाही.( महिला सन्मान योजना, जेष्ठ नागरिक तसेच वयोश्री योजना अंतर्गत येणारे वृद्ध 75 वर्षांवरील अशा सर्व व्यक्तींना सवलत दिली जाते )मध्यंतरी दिव्यांगांचे एसटी बस मधील आसन कायमस्वरूपी आरक्षित करावे यासाठी आम्ही दिव्यांग आयुक्तालयाकडे मागणी केली होती.त्यानुसार एसटी महामंडळाने सर्व बसमध्ये अपंगांसाठी शीट आरक्षित केले आहे. शिवनेरी बस, साधी शयन आसनी बसमध्येही सीट आरक्षित ठेवले आहेत. परंतु या बस मध्ये अपंग व्यक्तींना प्रवासात सवलत दिली जात नाही. याबाबत आयुक्त दिव्यांग कल्याण महाराष्ट्र यांनी निकाल पत्रामध्ये महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र,वाहतूक भवन डॉ आनंदराव नायर मार्ग मुंबई सेंट्रल मुंबई – 8 यांना ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे दिव्यांग लाभार्थ्यास विनावातानुकूलित तसेच शिवनेरी बस मध्ये सवलत अनुज्ञेय करणेबाबत गृह विभागास प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात यावा’ असे आदेश दिले होते. परंतु आज तगायत एसटी महामंडळाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.म्हणून आपण एसटी महामंडळ यांना पुन्हा आदेश द्यावेत अशी विनंती तक्रारीत केली आहे.तक्रारीची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईमेलद्वारे पाठवली आहे” एसटी महामंडळाने कोणतीही मागणी नसताना महिला सन्मान योजना ज्येष्ठ नागरिक योजना वयोश्री योजना शिवनेरी बस सह सर्व बसमध्ये सुरू केली.परंतु दिव्यांग व्यक्तींना सुरुवातीपासून असणारी सवलत ही शिवनेरी व शयन आसनी बस मध्ये दिली जात नाही याचा अर्थ दिव्यांग म्हणजे सवतीची मुलं असा होतो का? जर शिवनेरी सह सर्व बसमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रवासासाठी सवलत मिळाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल,”राजेंद्र वाकचौरे उपाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहर यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button