
राजमाता डिजिटल अँड लेझर कटिंग, येथे श्री रामेश्वर सुधाकर टेकाळे यांचा शाखा अभियंता पदावरून पदोन्नती होऊन उपविभागीय अधिकारी (स्थापत्य), जलसंपदा विभाग या पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल व निष्ठेबद्दल गौरव करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमास कुणाल निंबाळकर, मयूर काकडे, नाना जमदाडे, रोहित पडवळ, प्रदीप सूर्यवंशी, जमीर शेख, अभिजित सूर्यवंशी, शुभम मुंडे, शिवकुमार माने, बलराज रणदिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडले. सर्व उपस्थितांनी श्री टेकाळे यांना हार्दिक शुभेच्छा व पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक अभिनंदन केले.