रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत,ई-केवायसी करण्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आवाहन

Spread the love
 धाराशिव दि.२,(जिमाका):-सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ पर्यंत वाढवली आहे. ई-केवायसी न केल्यास शिधावाटप बंद होण्याची शक्यता असल्याने,सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
  यापूर्वी ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती.मात्र, आतापर्यंत केवळ ६९ टक्के लाभार्थ्यांनीच ई-केवायसी केली असून,उर्वरित ३१ टक्के लाभार्थ्यांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

ई-केवायसी करण्यासाठी रेशन दुकानांमधील ई-पॉस मशीनचा वापर करता येईल.तसेच, शासनाने “Mera e-kyc Mobile app” आणि “Aadhar Face RD Service app” सुरू केले असून, मोबाईलद्वारेही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
मोबाईलद्वारे ई-केवायसी करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.Google Play Store वरून “Mera e-kyc Mobile app” आणि “Aadhar Face RD Service app” डाउनलोड करून इन्स्टॉल करावे.Mera e-kyc Mobile app उघडून राज्य व ठिकाण निवडावे.आधार क्रमांक टाकून आलेला OTP प्रविष्ट करावा.
Face E-KYC वर क्लिक करून सेल्फी कॅमेराद्वारे चेहरा स्कॅन करावा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यशस्वी ई-केवायसीचा संदेश दिसेल.तरी सर्व रेशनकार्डधारकांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून अन्नधान्य वितरणात अडथळा येऊ नये,याची दक्षता घ्यावी.असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button