
आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन धाराशिव यांना प्रशांत कोरटकर (नागपूर) आणि अभिनेता राहुल सोलापूरकर (पुणे) या दोघांवर गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रारी अर्ज देण्यात आला. प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व मासाहेब जिजाऊ यांच्या बद्दल गलिच्छ वक्तव्य करून बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांच्या बद्दलच्या अत्यंत विकृत हिणकस लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत.

मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने हे प्रक्षोभक वक्तव्य व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे. प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सर यांना फोन द्वारे अत्यंत गलिच्छ भाषा वापरलेली आहे. तसेच अभिनेता राहुल सोलापूरकर याने देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक उल्लेख करून समस्त शिवप्रेमींच्या भावनांना ठेच पोहोचवलेली आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे भारतातील संपूर्ण शिवप्रेमी जनतेच्या मनाला वेदना झालेल्या आहेत.यामुळेच शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने उपाध्यक्ष श्री अमोल शिरसाट यांचे मार्फतीने शहर पोलीस स्टेशन धाराशिव येथील पोलीस निरीक्षक यांना तक्रारी अर्ज देण्यात आलेला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 196, 299, 353 अन्वये गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशन धाराशिव शहर येथे तक्रारी अर्ज देण्यात आलेला होता. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने गुन्ह्याची नोंद घेऊन सदरचा गुन्हा संबंधित पोलीस स्टेशन पुणे येथे वर्ग करण्यासाठी पाठवून देण्यात आलेला आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या तक्रारीची नोंद घडलेल्या गुन्ह्यातील एफ आय आर मध्ये अंतर्भाव करून तपास करण्यात येणार आहे. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे उपाध्यक्ष श्री अमोल सिरसट, सचिव श्री मंगेश निंबाळकर, शहराध्यक्ष हनुमंत यादव, शहर उपाध्यक्ष श्री आकाश भोसले, तालुका सचिव श्री बालाजी पवार, समितीचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट श्री अविनाश गरड, ॲडव्होकेट श्री संजय शिंदे, एडवोकेट श्री प्रशांत जगदाळे, श्री हनुमंत तांबे, उत्तमराव कदम,संतोष घोरपडे, बबलू भोईटे, योगेश आतकरे, अमोल साळुंके, ऋषिकेश काळे, दत्तात्रेय साळुंके, आशिष क्षीरसागर, शुभम लोकरे, ज्ञानेश्वर नलावडे, यांचे सह समितीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*