
तेरणा युथ फाऊंडेशन वाघोली येथे तेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष मेघ राणाजगजीतसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाघोली ता जि धाराशिव येथे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व युवकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच गोरगरीब विद्यार्थी तथा तरुणांना शिक्षणासाठी व रोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टीसाठी आम्ही तत्पर आहोत असे आश्वासन यावेळी देण्यात आले, प्रत्येक गावामध्ये गाव तेथे वाचनालय अशी संकल्पना भविष्य काळात राबविणार असल्याचे यावेळी सांगितले

मेघ पाटील वाघोली येथे आल्याने वाघोलीतील युवकांना नवीन ऊर्जा सकारात्मक उमेद देण्याचे काम केले झाले अशी भावना युवकांनी व्यक्त केली,
त्यावेळी त्यांना तेरणा युथ फाऊंडेशन चे अध्यक्ष महेश दादा खडके यांच्यासह, शुभम मगर ,राहुल खडके ,आबा पवार ,स्वप्निल मते ,दीपक शेळके ,प्रदीप मगर ,शैलेश पवार, काका माने ,पंकज सुलाखे ,सुधीर मगर ,बंटी खडके ,रोहन मगर , महेश खडके,किशोर पाटील सर आधी गावातील सर्व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन महेश खडके यांनी केले