तामलवाडी – प्रतिनिधी ( दि.०४ )
व्हाईस ऑफ मिडीयाच्या डिजिटल मिडिया विंगचा पदग्रहण सोहळा दि ०४ रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला यामध्ये व्हाईस ऑफ मिडीयाच्या डिजिटल मिडिया विंगच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी सर्जेराव गायकवाड तर तुळजापूर तालुका सचिवपदी सचिन शिंदे यांना नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
जगभरातील ४७ देशात पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा दि. ०४ डिसेंबर रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात नुकताच पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार, राज्य खजिनदार प्रवीण पावले, धाराशिव व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हाप्रसिद्धीप्रमुख सलीम पठाण, जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी शिवरत्न न्यूज चे संपादक सर्जेराव गायकवाड तर तुळजापूर तालुका सचिवपदी सचिन शिंदे यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली तसेच त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अत्याधुनिक युगात पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे किती गरजेचं आहे जो पत्रकार याचं ज्ञान घेऊन पत्रकारिता करेल त्यालाच भविष्य असल्याचे डिजिटल विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले. तसेच त्यांनी AI कसे काम करते याचे प्रात्याक्षिकही सादर केले.
तसेच जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी संघनटनेचे आजवरचे काम आणि पुढील काळात संघटना काय काम करणार आहे याची माहिती दिली. सर्जेराव गायकवाड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर तुळजापूर तालुका सचिवपदी सचिन शिंदे यांची निवड झाल्याने विविध माध्यमांतून त्यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव होताना दिसत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले तर आभार जुबेर शेख यांनी मानले.यावेळी जिल्ह्याभरातून पत्रकार यावेळी उपस्थित होते.