दिव्यांगदिनी रेल्वेकडून दिव्यांगांना खुशखबर,दोन तासांतच मिळणार दिव्यांगजन कार्ड – मयुर काकडे

Spread the love

आवश्यक कागदपत्रांची ऑनलाइन पूर्तता करा आणि केवळ दोन तासांत ‘दिव्यांगजन कार्ड’ मिळवा, अशा प्रकारची घोषणावजा माहिती दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी मध्य रेल्वेने केली. एका अॅपच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत दिव्यांगदिनी दिव्यांगांना रेल्वेने ही भेट दिली आहे.


दिव्यांगजनांना रेल्वे प्रवासात सवलत मिळवण्यासाठी रेल्वेकडून सवलतीचे कार्ड उपलब्ध करून दिले जाते. हे कार्ड दाखविल्यानंतरच त्यांना प्रवासी भाड्याच्या सवलतीची सुविधा मिळते. मात्र, हे कार्ड तयार करून घेण्यासाठी दिव्यांगांना अनेकदा रेल्वे कार्यालयाच्या येरझारा माराव्या लागतात. सवलतीचे कार्ड मिळावे म्हणून लांबच लांब रांगेत तासन् तास उभे राहावे लागते. परिणामी, दिव्यांगांना मोठा त्रास होतो. तो लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने दिव्यांगांना सवलतीचे कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी divyangjanid.indianrail.gov.in या संकेतस्थळाची (वेबसाइट) निर्मिती केली आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वारंवार येरझारा घालण्याचा दिव्यांगांचा त्रास वाचला आहे. दिव्यांग व्यक्ती सवलतीचे कार्ड मिळवण्यासाठी मोबाइल अथवा लॅपटॉपवर वेबसाइट ओपन करून त्यात अर्ज तसेच कागदपत्रे सबमिट करू शकतात. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच संबंधित व्यक्तीला दिव्यांगजन कार्ड ऑनलाइन उपलब्ध होऊ शकते. ते डाऊनलोड करून त्याचा वापर संबंधित व्यक्ती कुठेही करू शकतो, असेही मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व दीव्यांग व्यक्तींनी याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे अव्वाहन शिवअर्पण तथा प्रहार चे अध्यक्ष मयुर काकडे यांनी केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button